एका स्वातंत्र्यसैनिकाचा विवेकवाद!
लहानपणी ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये एक लेख आला होता. त्यामध्ये आमच्या गावाची दोन नावे दिली होती. शिंदे चिंचोली आणि कँप चिंचोली. गावात बहुतांश लोकांचे म्हणजे ९५ टक्के लोकांचे आडनाव शिंदे असल्याने, शिंदे चिंचोली हे नाव आले असावे, हे बालवयातही लक्षात आले. मात्र कँप चिंचोली या नावाचे गुढ तसेच राहिले. कँप चिंचोली नावाबाबत सुट्टीत गावी आल्यानंतर वडिलांना विचारले. …